gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात समाजशास्त्र विभाग आणि मराठी समाजशास्त्र परिषदेच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

र. ए. सोसायटीचे गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि मराठी समाजशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय समाज आणि विकास प्रक्रिया’ या विषयावरील दोन दिवसीय ३१ व्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले आहे.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग हा अत्यंत जुना शैक्षणिक असून, नामवंत आणि सुप्रतिष्ठीत संशोधक-अभ्यासक, प्राध्यापक या विभागाला लाभले आहेत. अध्ययन-अध्यापनाबरोबच संशोधनाच्या क्षेत्रातही विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. समाजशास्त्र विभाग आणि मराठी समाजशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ११ आणि दि. १२ एप्रिल, २०२२ रोजी ‘भारतीय समाज आणि विकास प्रक्रिया’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन गोगटे जोगळेकर महाविद्यालयात करण्यात आले आहे. या पूर्वीही महाविद्यालयात १९९६ मध्ये मराठी समाजशास्त्र परिषदेच्या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून, सुमारे २५ वर्षांनंतर विद्यमान वर्षी महाविद्यालयात मराठी समाजशास्त्र परिषदेचे अधिवेशन संपन्न होत आहे.

या चर्चासत्राचे उद्घाटन सोमवार दि. ११ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या समाजशास्त्रज्ञ प्राध्यापिका डॉ. श्रुती तांबे (विभाग प्रमुख, समाजशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) यांच्या हस्ते होणार असून, या उद्घाटन सोहळ्याला बीजभाषक म्हणून डॉ. परमजीतसिंग जज (माजी अध्यक्ष, भारतीय समाजशास्त्र परिषद, नवी दिल्ली), प्रमुख अतिथी डॉ. प्रदीप आगलावे (सदस्य सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समिती, महाराष्ट्र राज्य, मुंबई), डॉ. बालाजी केंद्रे (विभागप्रमुख, समाजशास्त्रविभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई), प्रा. नारायण कांबळे (अध्यक्ष, मराठी समाजशास्त्र परिषद), र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या उद्घाटन सोहळ्यानंतर होणाऱ्या विविध परिसंवादांमध्ये भारतीय विकास प्रक्रियेतील अंतर्विरोध, भारतीय समाज: नवे आकलन, नवे दृष्टीकोन, पर्यायी विकास चिंतन आणि भारतीय संविधान, कोकणातील पर्यावरणीय समस्या अशा अनेकविध विषयांवर विचारमंथन होणार असून, त्यात देशभरातील सामाजिक शास्त्रांचे प्राध्यापक, संशोधक-विद्यार्थी आपापल्या शोधनिबंधातून प्रकाश टाकणार आहेत.

या राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप मंगळवार दि. १२ एप्रिल, २०२२ रोजी दुपारी २ ते ४ यावेळेत प्रा. नारायण कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, या समारंभाला मुंबई विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. पी. जी. जोगदंड, भारतीय समाजशास्त्र परिषदेचे सचिव प्रा. डॉ. जगन कराडे, र. ए. सोसायटीचे सचिव श्री. सतीश शेवडे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या राष्ट्रीय चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनाकरिता मराठी समाजशास्त्र परिषदेची कार्यकारिणी आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, कला शाखा उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. तुळशीदास रोकडे आणि त्यांचे सहकारी, कला शाखेतील प्राध्यापक प्रयत्नशील आहेत. या राष्ट्रीय चर्चासत्रात देशभरातील सामाजिक शास्त्रांचे नामवंत अभ्यासक उपस्थित राहून आपले विचार मांडणार आहेत.

या विचार मंथनाचा लाभ अभ्यासक-विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.

Comments are closed.