gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात समाजशास्त्र विषयाचे राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

र. ए. सोसायटीचे गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि मराठी समाजशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय समाज आणि विकास प्रक्रिया’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र नुकतेच संपन्न झाले.

स्वातंत्र्यानंतर विषमता आणि भेदभावावर आधारित असलेल्या भारतीय समाजाच्या विकासासाठी भारतीय नेतृत्वाने सामाजिक न्यायाला केंद्रीभूत मानून पंचवार्षिक नियोजनाचे तत्व आणि मिश्र अर्थव्यवस्थेचा स्विकार केला. सामाजिक-राजकीय-आर्थिक सुधारणात्मक धोरणांचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम भारतीय समाजावर झाले. त्यातून विशिष्ट प्रश्नांच्या अनुषंगाने लढण्यासाठी विविध सामाजिक व राजकीय चळवळीचा जन्म झाला. समकाळात निर्माण झालेल्या विविध सामाजिक समस्या, त्यावरील उपायोजना यावर विचारमंथन व्हावे याहेतूने गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग आणि मराठी समाजशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ११ आणि दि. १२ एप्रिल २०२२ रोजी ‘भारतीय समाज आणि विकास प्रक्रिया’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. मराठी समाजशास्त्र परिषदेचे ३१ वे अधिवेशन होते. या अधिवेशनाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या समाजशास्त्रज्ञा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. श्रुती तांबे यांच्या हस्ते झाले. भारतामध्ये समकाळात अनेक प्रश्न ऐरणीवर आले असून, त्यांचा अभ्यास समाजशास्त्राच्या अभ्यासकांनी करण्याची नितांत गरज असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर मनोगतात समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. तुळशीदास रोकडे यांनी उपस्थितांनासमाजशास्त्र विभागाविषयी माहिती देऊन, अनेक नामवंत आणि सुप्रतिष्ठीत संशोधक-अभ्यासक, प्राध्यापक या विभागाला लाभले असून, अध्ययन-अध्यापनाबरोबच संशोधनाच्या क्षेत्रातही विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला असल्याचे सांगितले.

परिषदेच्या स्वागतपर मनोगतात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी संस्था आणि महाविद्यालयाच्या प्रगतीचा लेखाजोगा मांडून महाविद्यालयात सुरु असलेल्या विविध शैक्षणिक-सह शैक्षणिक उपक्रम, संशोधन याविषयी उपस्थितांना माहिती दिली.

याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.डॉ. पी. एस. पाटील यांनी परिषदेला शुभेच्छापर संदेश देताना सामाजिक शास्त्राच्या अभ्यासकांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांचा समाजावरील परिणामाचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

या परिषदेचेबीजभाषक डॉ. परमजीतसिंग जज (माजी अध्यक्ष, भारतीय समाजशास्त्र परिषद, नवी दिल्ली) यांनी आपल्या मनोगतातून समाजशास्त्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान, समाजशास्त्रातील बदलते प्रवाह, स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ आणि समकाळातील बदलते प्रवाह याविषयी विविध पैलू उपस्थितांना उलगडून दाखवले.

याप्रसंगी मराठी समाजशास्त्र परिषदेच्यावतीने समाजशास्त्राच्या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या अभ्यासकांचा मान्यवरांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यात सन २०१२, २०२०, २०२१ चे जीवनगौरव पुरस्कार अनुक्रमे डॉ. बी. एल जोशी, प्रा. डॉ. एस. एल. गायकवाड (औरंगाबाद), प्रा. डॉ. प्रदीप आगलावे (नागपूर), प्रा. रमेश जाधव (कोल्हापूर), प्रा.डॉ. रमेश कांबळे (मुंबई) यांना प्रदान करण्यात आले. तर र. ए. सोसायटी आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्यावतीने प्रा. एस. एन. पवार यांना कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात आला. या परिषदेच्या सांगता समयी मराठी समाजशास्त्र परिषदेच्यावतीने लेखन, प्रकाशन, अध्यापन-अध्ययन अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभ्यासकांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत ‘भारतीय समाज आणि विकास प्रक्रिया’ या विषयावर प्रकाश टाकणाऱ्या भारतीय विकास प्रक्रियेतील अंतर्विरोध, भारतीय समाज: नवे आकलन, नवे दृष्टीकोन, पर्यायी विकास चिंतन आणि भारतीय संविधान, कोकणातील पर्यावरणीय समस्या अशाविविध उपविषयांवरील मान्यवरांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आणि सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. या संशोधन कक्षांना भारतातील प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञांची नावे देण्यात आली होती. राज्यभरातून आलेल्या सामाजिक शास्त्राचे अभ्यासक, संशोधक प्राध्यापक-विद्यार्थ्यानी आपले विचार आणि शोधनिबंधातून सद्यस्थितीतील सामाजिक प्रश्नांना अनुसरून विविधपैलूंवर प्रकाश टाकला.

या परिषदेत परिसंवादाचे अध्यक्ष आणि वक्ते म्हणून सुप्रसिद्ध लेखक, वक्ते डॉ. मिलिंद बोकील, डॉ. पी. जी. जोगदंड (माजी विभागप्रमुख, समाजशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ), भारतीय समाजशास्त्र परिषद, नवी दिल्लीचे सचिव प्रा. डॉ. जगन कराडे, डॉ. प्रदीप आगलावे (सदस्य सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समिती, महाराष्ट्र राज्य, मुंबई), प्रा. डॉ. बालाजी केंद्रे (विभागप्रमुख, समाजशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई), ज्येष्ठ पत्रकार श्री. सतीश कामत, पत्रकार श्री. मनोज मुळ्ये, प्रा. नारायण कांबळे (अध्यक्ष, मराठी समाजशास्त्र परिषद), डॉ. संपत काळे, प्रा. डॉ. स्मिता अवचार, प्रा. डॉ. धनराज पाटील, प्रा. संजयकुमार कांबळे, र. ए.सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, सचिव श्री. सतीशजी शेवडे आदि मान्यवरांसह मराठी समाजशास्त्र परिषदेचे कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

ही परिषद गोगटे जोगळेकर महाविद्यालयात संपन्न झाली असल्याने हा क्षण संस्था, महाविद्यालयाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल, असे मत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी परिषदेच्या समारोपाप्रसंगी यांनी व्यक्त केले.

या राष्ट्रीय चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनाकरिता मराठी समाजशास्त्र परिषदेची कार्यकारिणी आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, कला शाखा उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांचे मार्गदर्शन तर समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. तुळशीदास रोकडे आणि त्यांचे सहकारी, कला शाखेतील प्राध्यापक, प्रबंधक श्री. रवींद्र केतकर, श्री. प्रसाद गवाणकर, विविध प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक वर्ग आणि विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comments are closed.