gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कम अँड लर्न फिजिक्स-अ फिजिक्स फेअर उपक्रम संपन्न

gjc-physics-fair-programme

प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे भौतिकशास्त्रातील मुलभूत संकल्पनांशी सबंधित प्रयोगांचे प्रदर्शन दि. ११ मार्च २०२२ रोजी आयोजित करण्यात आले होते. ‘कम अँड लर्न फिजिक्स-अ फिजिक्स फेअर’ या उपक्रमांतर्गत इ. ९वीतील विद्यार्थ्यांकरिता उपयुक्त माहिती देणारे विविध प्रयोग यामध्ये मांडण्यात आले होते. उर्जा, ध्वनी, प्रकाश, बल, विद्युत चुंबकिय परिणाम यांवर आधारित प्रयोग आणि प्रतिकृतींचा वापर संकल्पना स्पष्ट होण्यासाठी करण्यात आला.

महाविद्यालयातील शास्त्र शाखेच्या भौतिकशास्त्र विषयाच्या पदवी विभागातील विद्यार्थ्यांनी सदर प्रयोगांची मांडणी केली व शालेय विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत त्यातील वैज्ञानिक तत्वे प्रयोगांसह समजावून सांगितली. या प्रदर्शनाचा जी.जी.पी.एस. प्रशालेतील ४० आणि शिर्के प्रशालेतील ४० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे संकल्पना समजावून घेण्याचा उपक्रम असल्याने सदर विद्यर्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आणि सकारात्मक प्रतिसाद दिला.

हा सुनियोजित उपक्रम भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. महेश बेळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विभागातील प्राध्यापक व प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वी यशस्वीपणे संपन्न झाला. सदर उपक्रमाला गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी आणि शास्त्रशाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी सदिच्छा भेट दिली आणि विभागाचे अभिनंदन केले.

Comments are closed.