gogate-college-autonomous-logo

माजी विद्यार्थी श्री. नितीन गजानन मिरकर यांची रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीला देणगी

nitin-mirkar-donation-to-r-e-society

आपण ज्या ठिकाणी शिक्षण, सांस्कृतिक आणि क्रीडा या क्षेत्रात यशस्वी झालो ती संस्था आणि महाविद्यालय यांच्याविषयी असलेली आपुलकी व बांधिलकी राखत माजी विद्यार्थी श्री. नितीन गजानन मिरकर यांनी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांच्याकडे रु. ५०,००० देणगीचा धनादेश नुकताच सुपूर्द केला. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या १९९५च्या माजी विद्यार्थ्यांचे जीजेसी फॅमिली-कॉलेज कट्टा ग्रुपचे ‘ब्लॉसम-९५’ स्नेहसंमेलन महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात नुकतेच संपन्न झाले. या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी श्री. नितीन मिरकर यांनी देणगीची घोषणा केली होती. सदर देणगी स्विकारताना कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी संस्था विविध उपक्रम हाती घेत असून माजी विद्यार्थ्यांनी असेच संस्थेप्रती आपुलकी दाखवावी अशी इच्छा प्रकट केली.

श्री. नितीन मिरकर गोगटे जोगळेकर महाविद्यालयात असताना महाविद्यालयाचे दोनवेळा जी.एस. राहिले असून एन.सी.सी. आणि क्रीडा क्षेत्रात विशेष नैपुण्य प्राप्त केले आहे. सध्या ते बीड येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. या आनंदाच्या क्षणी त्यांनी सर्व संस्था प्रतिनिधी, माजी प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि माजी विद्यार्थी यांचे मनापासून आभार व्यक्त केले.

Comments are closed.