gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या निसर्ग मंडळातर्फे निसर्ग सहल संपन्न

gjc-nature-club-nature-walk-prog

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या निसर्ग मंडळातर्फे दि. २१ ऑगस्ट २०२२ रोजी पानवल परिसरात निसर्ग सहलीचे आयोजन करण्यात आले. या सहलीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी श्री. प्रणव पानवलकर प्रवक्ते म्हणून लाभले होते. Applied Environmental Research Foundation (AERF), Ratnagiri येथे ते क्षेत्रीय अभ्यासक म्हणून कार्य करतात.

प्रारंभी प्रा. अतीका राजवाडकर यांनी प्रवक्त्यांची थोडक्यात ओळख करून दिली. आपल्या कार्याबद्दलची माहिती प्रवक्त्यांनी थोडक्या शब्दांत विषद केली. तसेच त्यांनी निसर्गातील वैशिष्ट्यांबद्दल; बदलणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींचीही माहिती दिली.

सहलीच्या शेवटी निसर्ग मंडळाचे संयोजक डॉ. नितीन पोतदार यांनी श्री. प्रणव पानवलकर यांचे आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमामध्ये निसर्ग मंडळाच्या ५५ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला तसेच प्रा. अंबादास रोडगे, प्रा. श्वेता पटवर्धन, प्रा. श्वेता आरेकर यांचाही सहभाग होता. निसर्ग सहलीच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी निसर्ग मंडळाचे अभिनंदन केले.

Comments are closed.