gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत कविता पठण कार्यक्रम संपन्न

hindi-department-programme-aug-2022-1

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील हिंदी विभागाच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत स्वच्छता अभियान व राष्ट्रीय हिंदी कवींच्या कविता पठणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना हिंदी विभागप्रमुख डॉ. शाहू मधाळे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील हिंदी कवींनी केलेल्या राष्ट्रीय योगदानाची माहिती देत विद्यार्थ्यांनी आपल्या देशाबद्द्ल अभिमान बाळगुन राष्ट्रप्रेम जोपासले पाहिजे असे सांगितले.

कार्यक्रमास कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत ‘हर घर तिरंगा’ अभियानास शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत हिंदी विभागाचे कौतुक केले. स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या क्रांतिकारक, लेखक आणि राष्ट्रीय नेत्यांच्या महत्त्वपूर्ण कार्यावर प्रकाश टाकला. स्वातंत्र्यलढ्यातील नेते, राष्ट्रपुरूषांविषयी तसेच देशाचे स्वाभिमान व रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती आपण अभिमान, आदर बाळगला पाहिजे, असे मत व्यक्त केले.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी अनेक राष्ट्रीय कवींच्या कवितेचे पठण केले. तसेच या कवितांचा भावार्थही विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. कृष्णात खांडेकर यांनी केले.

hindi-department-programme-aug-2022-2
Comments are closed.