gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे हर घर तिरंगा पथनाट्य सादरीकरण

gjc-har-ghar-tiranga-nss-news-aug-22-2

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असताना हर घर तिरंगा अभियान राबविले जात आहे. प्रत्येक घरावरती स्वतंत्र भारताचा अभिमान आणि शान असलेला राष्ट्र ध्वज फडकाविला जावा यासाठी विशेष अशी राष्ट्र ध्वज संहिता आणि नियमावली यांची जाणीव जागृती जनसामान्यांना व्हावी यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयं सेवक पथनाट्य माध्यमातून जाणीव जागृती करीत आहेत. पोलीस परेड मैदान व गोगटे जोगळेकर महाविद्यालय परिसरात या विद्यार्थांनी पथनाट्य सदर करून प्रत्येक घरी तिरंगा फडकविण्याचे नियम समजून सांगितले.

पथनाट्य सादरीकरणा प्रसंगी जिल्ह्याधिकारी बी. एन पाटील, वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्री. मोहित कुमार गर्ग, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुरानी जाखड, पोलीस दलातील विविध अधिकारी, विविध प्रशासकीय अधिकारी, रत्नागिरीतील शाळांचे शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

महाविद्यालयातील सादरीकरणादरम्यान राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे महाविद्यालयातील कार्यक्रमाधिकारी डॉ. दानिश गनी, प्रा. सचिन सनगरे, विभागातील स्वयंसेवक तसेच महाविद्यालयातील स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.

gjc-har-ghar-tiranga-nss-news-aug-22-1

Comments are closed.