gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात डीबीटी स्टार कॉलेज स्कीम अंतर्गत ‘अपघात कसे टाळावेत’ ह्या विषयावरील प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

gjc-dbt-star-college-workshop-1

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रशिक्षण समिती यांच्यातर्फे दि. ११ ऑक्टोबर २०२२ रोजी ‘अपघात कसे टाळावेत’ ह्या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले गेले. ह्याप्रसंगी व्यासपीठावर प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, शिक्षकप्रशिक्षण समितीचे समन्वयक डॉ. महेश बेळेकर, डॉ. एम. जी. गोरे, डीबीटी समन्वयक डॉ. विवेक भिडे व प्रमुख व्याख्याते डॉ. प्रबोध चोबे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख शिक्षकप्रशिक्षण समितीचे समन्वयक डॉ. महेश बेळेकर यांनी केले. उद्घाटन प्रसंगी पाहुण्याचे स्वागत व सत्कार प्र. प्राचार्यडॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले व सहभागी विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.

डॉ. प्रबोध चोबे हे बी. ए. एस. एफ. या संस्थेत रिसर्च अँड डेव्हलोपमेंटचे माजी प्रमुख आहेत. पहिल्या सत्रामध्ये त्यांनी आपघातांच प्रमाण शून्यावर आणण्यासाठी कश्याप्रकारे काळजी घ्यावी, काळज्या हयाबद्दल माहिती दिली. त्यांना आलेले अनुभव, केमिकल वापरताना पेहराव कसा असावा हयाबद्दल दुसऱ्या सत्रात मार्गदर्शन केले. शेवटच्या सत्रामध्ये प्रत्यक्षात लॅबमध्ये जाऊन विद्यार्थ्याना गोष्टींची पाहणी करायला सांगत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सत्र पूर्ण केले.

ह्या कार्यक्रमाला गोगटे जोगळेकर महाविद्यालायचे ३० शिक्षक, ३४ शिक्षकेतर कर्मचारी, २०० विद्यार्थी व ४ क्लस्टर महाविद्यालयांचे ६ प्रतिनिधि उपस्थित होते.

सरतेशेवटी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगतं व्यक्त केली. प्र. प्राचार्यडॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी समारोपाच्या कार्यक्रमात अशी आशा व्यक्त केली की आजपर्यंत शून्य अपघाताचे प्रमाण आहे तसेच याहीपुढे अजून काळजी घेऊन ते टिकवण्याच प्रयत्न महाविद्यालय नक्की करेल.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सोनाली कदम यांनी केले तर आभारप्रदर्शन प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. मधुरा मुकादम यांनी केले.

gjc-dbt-star-college-workshop-2
gjc-dbt-star-college-workshop
Comments are closed.