gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रथम वर्ष अर्थशास्त्र विषयाची सुधारित अभ्यासक्रम कार्यशाळा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रथम वर्ष अर्थशास्त्र विषयाची सुधारित अभ्यासक्रम कार्यशाळा संपन्न

अर्थशास्त्र अभ्यासमंडळ, मुंबई विद्यापीठ आणि अर्थशास्त्र विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्ष कला आणि वाणिज्य या अभ्यासक्रमाचे प्रथम आणि द्वितीय सत्राकरिता असलेल्या सुधारित अभ्यासक्रम व परीक्षापद्धतीविषयी कार्यशाळा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात नुकतीच संपन्न झाली. या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विषयाचे अभ्यास मंडळ सदस्य डॉ. सुरेश नाळे आणि डॉ. बालाजी सुरवसे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकसनासाठी आवश्यक असणाऱ्या अभ्यासघटकांचा समावेश नव्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. अर्थशास्त्र विद्याशाखेत नव्याने उदास आलेल्या संकल्पनांचा समावेश या सुधारित अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. याविषयी बोलताना डॉ. नाळे म्हणाले की, ‘अर्थशास्त्र विषयातून विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख कौशल्ये विकसित होण्यास मदत होऊ शकते त्या दृष्टीने अभ्यासक्रमात सुधारणा करण्यात आली आहे. सदर कार्यशाळेत कोकणासारख्या ग्रामीण व विशेष भौगोलिक क्षेत्र लाभलेल्या प्रदेशात विद्यार्थ्यांनी उपजीविकेसाठी आवश्यक असणारी कौशल्ये अभ्यासक्रमातून कशाप्रकारे देता येतील व त्यासाठी अर्थशास्त्र विषय कसा उपयुक्त ठरेल याविषयी दिशादर्शन करण्यात आले.

कार्यशाळेत अध्यक्षीय मार्गदर्शन करताना जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनकौशल्य विकासासाठी अभ्यासक्रमाची सांगड आपण कोणत्या पद्धतीने घालू शकतो, नॅक मुल्यांकन संस्थेचे बदललेले निकष आणि अभ्यासक्रमाची योजना कशा पद्धतीने आपण राबवू शकतो अशा विविध बाबींचा आढावा घेतला. तसेच त्यांनी अंतर्गत मूल्यमापन पद्धतीच्या सहाय्याने गुणवत्ता सुधारासाठी आवश्यक सूचना विशेषत्वाने केल्या.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषय असलेल्या प्राध्यापक प्रतिनिधींनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. या कार्यशाळेसाठी मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र अभ्यासमंडळाच्या अध्यक्षा डॉ. डॉली सनी, जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळा नियोजनासाठी कला शाखा उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. रामा सरतापे, सहकारी डॉ. दिनेश माश्रणकर, प्रा. सुर्यकांत माने यांनी परिश्रम घेतले.

h
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रथम वर्ष अर्थशास्त्र विषयाची सुधारित अभ्यासक्रम कार्यशाळा संपन्न
Comments are closed.