gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘डिजिटल आर्थिक साक्षरता अभियान’ अंतर्गत स्वयंसेवक प्रशिक्षण संपन्न

भारत सरकारच्या ‘डिजिटल आर्थिक साक्षरता अभियान’ अंतर्गत स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यशाळेचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयात नुकतेच आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कॅशलेस समाज हे उद्दिष्ट समोर ठेऊन सरकारची भूमिका लक्षात घेता समाजात याविषयी जनजागृती होणे गरजचे आहे.

यासाठी पॉवरपॉइंट प्रेझेन्टेशनद्वारे प्रा. तेजश्री भावे आणि प्रा. मेधा सहस्रबुद्धे यांनी उपस्थितांना प्रशिक्षण दिले. यामध्ये इंटरनेट व मोबाईल बँकिंग, व्यापरी व ग्राहकांसाठी असलेल्या सुविधा, व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, कॅशलेस होण्यासाठी आवश्यक इतर घटक याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. दर्शन जैन, सौरभ भोसले, ह्रीषिकेश साळवी, सुशांत पाटील या विद्यार्थांनी प्रशिक्षण प्रक्रियेत सक्रीय सहभाग घेतला. या कार्यशाळेत महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान, राष्ट्रीय सेवा योजना, वाणिज्य विभाग, विज्ञान विभाग आणि छात्र सेना या विभागांतील विद्यार्थी सह्भागी झाले होते. त्यांना सरकारच्या कॅशलेस योजनेची माहिती सांगणारी एक माहितीपत्रीकासुद्धा देण्यात आली.

सह्भागी प्रशिक्षित विद्यार्थीच हे अभियान समाजापर्यंत नेणार आहेत. आर्थिक व्यवहार डीजीटल करण्याच्या प्रक्रियेत महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत स्त्रोत व प्रशिक्षक तयार करणे या उद्देशाने दि. १९ डिसेंबर पासून स्वयंसेवक नोंदणी करण्यात येणार आहे.

या प्रशिक्षण कार्यशाळेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे विशेष असे मार्गदर्शन लाभले.

Comments are closed.