gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात बँकिंग क्षेत्राकरिता दि. १९ डिसेंबर २०२२ रोजी कॅंम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेलमार्फत दि. १९ डिसेंबर २०२२ रोजी कॅंम्पस इंटरव्ह्यू आयोजित करण्यात आले आहेत. सदरचे इंटरव्ह्यू महाविद्यालयातून २०१९, २०२० आणि २०२१ या शैक्षणिक वर्षामध्ये कोणत्याही शाखेतून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. आय.सी.आय.सी.आय. बँकेतील रिलेशनशिप मॅनेजर या पदाकरिता घेतले जाणारे हे इंटरव्ह्यू ‘ग्लोबल कोथरूड, पुणे’ टाईम्स ऑफ इंडिया ग्रुपच्या ‘टाईम्स प्रो’चे एज्युकेशन विंग म्हणून काम करणाऱ्या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आले आहेत.

तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसाहित बायोडेटा, आधार किंवा पॅन कार्ड, फोटो, प्रमाणपत्रे इ.सह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सदर इंटरव्ह्यू महाविद्यालयाची मुख्य इमारत, डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉल येथे सकाळी १०.३० वाजता सुरु होतील याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत यांचेशी ९४२११४२५२९ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.

Comments are closed.