gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात बॉशच्या ब्रिज कोर्सची तिसरी बॅच सुरु

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थी केंद्रित विविध उपक्रमांप्रमाणेच करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेलतर्फे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता बॉश इंडिया लि. या कंपनीच्या सी.एस.आर. उपक्रमाचा एक भाग म्हणून कंपनीने खास तयार केलेला ब्रीज हा सॉफ्ट स्किल्स आणि एम्प्लॉयबिलीटी स्किल्स शिकवणारा कोर्स चालविला जातो. महाविद्यालय आणि ध्येय अकादमी व आर. फीज अकादमी, रत्नागिरी यांची असंयुक्त विद्यमाने चालविल्या जाणाऱ्या या कोर्सच्या आतापर्यंत दोन बॅचेस यशस्वीपणे पूर्ण झाल्या असून विद्यार्थ्यांना खूप फायदा झाला आहे.

तिसरी बॅच जानेवारी २०२३ मध्ये सुरु होत असून मोजक्याच जागा शिल्लक आहेत; तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत ९४२११४२५२९ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.

 

Comments are closed.