gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘प्रथम वर्ष विज्ञान’ प्रवेशाचे काम सुरु

नुकताच इ. १२वी चा निकाल जाहीर झाला असून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने प्रथमवर्ष प्रवेशाचे वेळापत्रक जाहिर केले आहे. दि. ६ जून पासून विद्यार्थी तसेच पालक महाविद्यालयाला भेट देऊन प्रवेशासंबंधी माहिती घेऊ शकतात, तसेच काही विषयांमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

गोगटे जोगळेकर महाविद्यालय कोकणातील नामांकित महाविद्यालय असून महाविद्यालयाला नुकताच स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्राप्त झाला आहे. महाविद्यालयाचा विज्ञान विभाग दर्जेदार शिक्षणाबरोबरच आधुनिक पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा उपकरणे तसेच ग्रंथालय सुविधा यांनी सुसज्ज आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालयात १० विषयांत विज्ञानाची पदवी घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र हे मूलभूत विषय तर मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स आणि माहितीतंत्रज्ञान (आय.टी.) हे व्यावसायिक अभ्यासक्रम महाविद्यालयात उपलब्ध असून यापैकी सहा विभागात पदव्युत्तर तर तीन विभागांत पी.एचडी. पर्यंत शिक्षण घेणे शक्य आहे.

इ.१२ वी नंतर नक्की कोणता पर्याय निवडावा याविषयी विद्यार्थी आणि पालक यांच्यात संभ्रम असतो. हे लक्षात घेऊन गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. ६ जून २०२३ पासून तज्ज्ञ प्राध्यापकांकडून मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीप्रमाणे कोणते विषय निवडावेत, निवडलेल्या विषयांमध्ये पुढे कोणत्या संधी उपलब्ध आहेत; यासंबंधी मार्गदर्शन तसेच प्रवेश प्रक्रियेसबंधी माहिती, ऑनलाईन फॉर्म भरून देण्यासाठी मदत इ. सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

इ. १२वी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला भेट देऊन आपल्या प्रवेशाचे काम पूर्ण करावे तसेच प्रवेशाविषयी अधिक माहितीसाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.

Comments are closed.