गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या व मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्र वितरण समारोह शुक्रवार दि. ०८ मार्च २०१९ रोजी सायंकाळी ०४.०० वाजता गोगटे जोगळेकर महाविद्यालाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात संपन्न होणार आहे.
कला, वाणिज्य आणि विज्ञान विभागातील संबंधित पदवीप्राप्त सर्व विद्यार्थ्यांनी सदर पदवीदान समारंभास वेळेवर उपस्थित राहावे, असे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कळविले आहे.