gogate-college-autonomous-logo

मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बी.एम.एस. शाखेचा निकाल जाहीर; गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा निकाल ९८.४६%

मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बी.एम.एस. शाखेचा शैक्षणिक वर्ष 2022-23 चा निकाल जाहीर झाला असून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा बी.एम.एस. शाखेचा निकाल ९८.४६% लागला असून ह्या विभागातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय सुयश प्राप्त केले आहे. विभागात प्रथम येण्याचा मान अर्पिता शेट्ये हिला मिळाला तर स्फुर्ती शेरे आणि निधिश राणे यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकवला आहे.

यंदा बी.एम.एस. विभागाला २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. आजपर्यंत अनेक विद्यार्थी या अभ्यासक्रमातून उत्तीर्ण झाले आहेत. या अभ्यासक्रमात व्यवस्थापनाशी संबंधित विषय शिकवले जातात. या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात दोन स्पेशलायझेशन विषय आहेत 1) मार्केटिंग 2) फायनान्स. या पदवीनंतर विद्यार्थी एमबीए तसेच इतर व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण करतात. यशस्वी विद्यार्थी अनेक MNC मध्ये भरती होतात किंवा स्वतः चा व्यवसाय करतात. सदर अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये industrial visit करता येते. तसेच अभ्यासक्रमाव्यतिरिक्त share marketing , Tourism चे अनेक कोर्से शिकवले जातात . ह्या सर्वांचा उपयोग त्यांना भविष्यात नक्की होतोच.

सर्व यशस्वी विद्यार्थी आणि विभागातील मार्गदर्शक प्राध्यापक यांचे र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पा पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी तसेच उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, डॉ. मकरंद साखळकर, विभाग प्रमुख प्रा. अश्विनी देवस्थळी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहे

Comments are closed.