gogate-college

”गोगटे जोगळेकर महाविद्यालयात झेप महोत्सवा अंतर्गत विद्यार्थ्याच्या विविध कलागुणांची उधळण”

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात सुरु असणाऱ्या ‘झेप’ या युवा महोत्सवात फ्लॅश मॉब आणि स्टॅचू डान्स या स्पर्धा संपन्न झाल्या.
जमलेल्या मॉब मधून विद्यार्थ्यानी पुढे येऊन त्याच्यातील एक कलागुण प्रदर्शित करावा असे फ्लॅश मॉब या स्पर्धेचे स्वरूप होते. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुफिया ईनामदार यांनी काम पहिले. यामध्ये नाथप्रसाद बारसकर, रुहीना गुहागरकर आणि कृष्णा पाटील यांनी प्रथम, गौरव बंडबे याने व्दितिय आणि श्रुती जैन हिने तृतीय क्रंमाक प्राप्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती जैन हिने केले.
त्यानंतर नेहमीच्या डान्स फॉर्मसना कलाटणी देणारा स्टॅचू डान्स ही स्पर्धा पार पाडली एका जागी उभे राहून किती अप्रतिम डान्स करता येतो हे विद्यार्थांनी दाखून दिले. वैभव खेडेकर आणि सुभम सर यांनी या कार्यक्रमाचे परीक्षण केले यामध्ये किरण पाटील प्रथम टि.वाय मायक्रो ग्रुप व्दितिय आणि गणेश राठोड तृतीय क्रमांक प्राप्त केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष गीते याने केले.
वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या डॉ यास्मिन आवटे आणि प्रा. बीना कळंबटे यांच्या उपस्थितीत सदर स्पर्धा उत्तम रीतीनेपार पाडल्या व्दितिय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थांनी या स्पर्धेचे नियोजन केले होते. यासाठी त्यांना प्रा. राजवाडकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)