gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मैथिली सावंत हिची ‘युथ एक्सचेंज प्रोग्राम-२०१८’ करिता निवड

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मैथिली सुनील सावंत (द्वितीय वर्ष विज्ञान) हिची यावर्षी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलनाकरिता निवड झाली आहे. प्रत्येक एन.सी.सी. कॅडेटचे हे एक मोठे स्वप्न असते. शिपमॉडेलिंगकरिता तीने विशेष प्रयत्न केले आहेत.
तसेच एन.सी.सी. नेव्हल विभागाची लीडिंग कॅडेट असलेली मैथिली मानाच्या अशा आंतरराष्ट्रीय ‘युथ एक्सचेंज प्रोग्राम-२०१८’ करिता देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या आंतरराष्ट्रीय शिबिराकरिता निवड होण्यासाठी खूप खडतर असे प्रयत्न करावे लागतात. यामद्धे मुलाखत, लेखी परीक्षा, इव्हेंट सादरीकरण, परेड, व्यक्तिमत्व, सामान्यज्ञान अशा विविध प्रक्रियांमधून निवड व्हावी लागते. या भारताबाहेर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय शिबिराकरिता भारतातून केवळ १०० विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
या कामगिरीबद्दल कु. मैथिली हिचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, कमांडिंग ऑफिसर निळकंठ खौंड, एन.सी.सी. ऑफिसर कॅप्टन सीमा कदम, एस.एम.आय. श्री. शशिकांत जाधव आणि एन.सी.सी. ऑफिसर्स यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.