gogate-college
shubham-dafale

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या शुभम डाफळे याला मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदक

मुंबई विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या १६०व्या दीक्षांत समारंभात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या शुभम सुरेश शुभांगी डाफळे या विद्यार्थ्याने कार्बनी रसायनशास्त्र (ऑरगॅनिक केमिस्ट्री) या विषयातील पदव्युत्तर परीक्षेमध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे. या परीक्षेत त्याला ८४.९% गुण प्राप्त झाले. कु.शुभम याला डॉ. ए. एन. कोठारे स्मृतिप्रित्यर्थ दिले जाणारे सुवर्णपदक समारंभाचे प्रमुख अतिथी आणि रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख श्री. मुकेश अंबानी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या दीक्षांत समारंभाकरिता मा. राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती श्री. विद्यासागर राव, मा. कुलगुरू डॉ. संजय देशमुख, बोर्ड ऑफ कॉलेज अॅन्ड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंटचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
शुभम डाफळे याच्या उज्ज्वल यशाबद्दल गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अॅड. विलास पाटणे, उपकार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह अॅड. प्राची जोशी, महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे यांनी विशेष नैपुण्यप्राप्त विद्यार्थी तसेच विभागातील मार्गदर्शक शिक्षक यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.
 
  • 2017 (117)
  • 2016 (37)