gogate-college
seema

गो. जो. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कॅप्टन डॉ. सीमा कदम यांचा झेप युवा महोत्सवात सत्कार

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागात कार्यरत असणाऱ्या प्राध्यापिका कॅप्टन डॉ. सीमा कदम यांना भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे आयोजित ३३व्या राष्ट्रीय परिषदेत ‘वीरांगना सावित्रीबाई फुले फेलोशिप २०१७’ या फेलोशिपने गौरविण्यात आले. त्यानिमित्ताने महाविद्यालयाच्या झेप युवा महोत्सव २०१७ मद्धे र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
भारतीय दलित साहित्य अकादमी साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या भरीव योगदानाबद्दल गौरवात असते. डॉ. सीमा कदम यांच्याही विविध क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)