gogate-college
principle-news

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांची मुंबई विद्यापीठाच्या ‘विद्यापरीषदेवर’ नियुक्ती

मुंबई विद्यापीठाच्या ‘विद्यापरिषद’ या अंतरिम अधिकार मंडळावर संचलित, स्वायत्त किंवा संलग्न महाविद्यालयाचे प्राचार्य प्रतिनिधी सदस्य म्हणून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. मुंबई विद्यापीठ येथे झालेल्या समारंभात विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी त्यांना सदर नियुक्तीचे पत्र दिले. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे, प्र-कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. सुखटणकर यांच्या मुंबई विद्यापीठाच्या ‘विद्यापरिषदेवर’ झालेल्या नियुक्तीबद्दल र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, इतर संस्था पदाधिकारी आणि महाविद्यालयातील प्राध्यापक यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)