gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात एम. ए. प्रवेश परिक्षा रविवार दि. २३ जुलै २०१७ रोजी

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या एम.ए. (भाग-१) अभ्यासक्रमाकरिता प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु होत आहे. पंचवीस वर्षांची परंपरा असलेल्या ‘लोकमान्य टिळक पदव्युत्तर केंद्राच्या’ कला शाखेमध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी आणि संस्कृत या भाषांमध्ये तर समाजशास्त्र, इतिहास आणि अर्थशास्त्र या सामाजिक शास्त्रांमध्ये मुंबई विद्यापीठाचे एम. ए. चे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या सर्व विषयांचे अभ्यासक्रम संपूर्ण (८ पेपर्स) स्वरूपाचे असून ते नियमित, सेमिस्टर आणि अंतर्गत अधिक बाह्यमूल्यमापन (४० अधिक ६० गुण) पद्धतीचे आहेत. विज्ञान, वाणिज्य, शेती, विधी, अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र अशा अन्य विद्याशाखांचे पदवीधर किंवा कलाशाखेच्याच उपरोक्त विषयांपेक्षा वेगळे विषय घेऊन पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देखील एम. ए. करिता याठिकाणी प्रवेश घेऊ शकतात.

मात्र त्याकरिता ते घेऊ इच्छित असलेल्या विषयाची एक सामान्यज्ञान चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सदर चाचणी रविवार दि. २३ जुलै २०१७ रोजी स. ११.०० ते दु. १२.०० या वेळेत होईल. या संदर्भात अर्ज अथवा अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या कार्यालयात श्रीमती लाला (फोन: २२१३११) यांच्याशी संपर्क साधावा असे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)