gogate-college
gjc-maths1

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागातील कस्तुरी भागवत हिचे स्पर्धेत सुयश

राष्ट्रीय गणित दिवसाचे औचित्य साधून सोलापूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या क़्विझ, पोस्टर प्रेझेंटेशन आणि सेमिनार स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील गणित विभागाच्या कु. कस्तुरी भागवत (तृतीय वर्ष विज्ञान) हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. स्मृतिचिन्ह, रोख रु. १००० आणि प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. तीने सेमिनारसाठी आंबा ग्रेडिंग करिता फजी मॅथॅमॅटिक्सची उपयुक्तता आणि पोस्टर प्रेसेंटेशनकरिता विविध आजारांवर फजी मॅथॅमॅटिक्सची उपयुक्तता असे विषय निवडले होते. या संशोधनाकरिता तीला गणित विभागप्रमुख डॉ. राजीव सप्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले होते.
या यशाबद्दल कु. कस्तुरी हिचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

gjc-maths1
h
Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)