gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात एम. कॉम. परिक्षा अर्ज भरण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचना

मुंबई विद्यापीठाच्या नोव्हेंबर २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे प्रवेश अर्ज खालील नमूद केलेल्या तारखानुसार या mu.ac.in वेब साईट वरून भरावयाचे आहेत. परीक्षा अर्ज भरून झाल्यानंतर त्याची त्याची प्रिंट घेऊन आवश्यक कागदपत्रे परीक्षा फीसह महाविद्यालयाच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत द्यावयाचे आहेत.

एम.कॉम. (सेम. २ आणि ४) नियमित परीक्षा शुल्क रु. १५५० अर्ज भरण्याची तारीख ३१-१०-२०१७ ते ३-११-२०१७, विलंब शुल्क १६५० अर्ज भरण्याची तारीख ०६-११-२०१७ ते ०७-११-२०१७, अतिविलंब शुल्क २०५० अर्ज भरण्याची तारीख ०९-११-२०१७ ते ११-११-२०१७.

एम.कॉम. (सेम. १ आणि ३) नियमित परीक्षा शुल्क रु. १५५० अर्ज भरण्याची तारीख ०२-११-२०१७ ते १०-११-२०१७, विलंब शुल्क १६५० अर्ज भरण्याची तारीख ११-११-२०१७ ते १६-११-२०१७, अतिविलंब शुल्क २०५० अर्ज भरण्याची तारीख १८-११-२०१७ ते २२-११-२०१७.

एम.कॉम. (सेमी ४) या परीक्षेसाठी नियमित म्हणून प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कामध्ये पदवी प्रमाणपत्र शुल्क रु. २५० भरावे लागतील. तसेच एम.कॉम. (सेम. १ आणि २) परीक्षा पास असणाऱ्या विद्यार्थ्यांनीच एम.कॉम. (सेमी ४) चा परीक्षा अर्ज भरावयाचा आहे. परीक्षा अर्जासोबत गुणपत्रकाची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे.

तरी संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी असे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कळविले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)