gogate-college
paryavaran-jagruti-mandal

अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात पर्यावरण जाणीव जागृती अभियान मंडळ उद्घाटन संपन्न

अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेल्या “पर्यावरण जाणीव जागृती अभियान मंडळाचा” उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून नुकताच संपन्न झाला. या निमित्ताने ‘पर्यावरणाशी आपला दैनंदिन संपर्क’ या विषयावर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे भूगोल विभागप्रमुख डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई यांचे व्याख्यान झाले. त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना पर्यावरणस्नेही जीवनशैली राखा, जास्तीत जास्त स्थानिक वस्तूंचाच वापर करा. आपल्या वापरातील जास्तीत जास्त वस्तू या सेंद्रिय असतील याची काळजी घ्यावी. आपले घर हे जास्तीत जास्त कसे पर्यावरणपूरक असेल याची काळजी घ्यावी. तसेच पर्यावरणाविषयी आपली कृती महत्वाची आहे; अशा सर्व बाबींची माहिती त्यांनी विविध उदाहणे देऊन स्पष्ट केले. अध्यक्षीय समारोप उपप्राचार्य अशोक पाटील यांनी केला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी पर्यवेक्षिका प्रा. विशाखा सकपाळ, कला शाखा प्रमुख प्रा. डी. आर. वालावलकर, अभियान मंडळप्रमुख प्रा. स्मिता पाथरे, सदस्य प्रा. मयुरेश कांदळकर, प्रा. बी. ए. कांबळे, प्रा. सुनील भोईर, आणि विद्यार्थी वर्गाची उत्स्फूर्त अशी उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मधुसूदन लेले यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. श्रीम. गोखले यांनी केले.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)