gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कॉमर्सच्या विद्यार्थानी पूल कॅम्पस ड्राईव्ह मध्ये नेत्रदीपक यश

महाविद्यालाच्या प्लेसमेंट सेलतर्फे फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड टेक्नोलॉजिच्या सहकार्याने नुकत्याच घेण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईवमध्ये महाविद्यालाच्या कॉमर्स व बी.एम.एस. विभागातील विद्यार्थानी हे यश मिळविले. पुणे येथील एम्फासिस लि. (Emphasis limited) या कंपनीकरीता झालेल्या या कॅम्पस ड्राईव्हमध्ये ‘ट्रेनी ट्रान्झॅक्शन, प्रोसेसिंग ऑफिसर’ म्हणून महाविद्यालयाच्या एकून आठ विद्यार्थांची निवड झाली असून हे सर्व विद्यार्थी वरील कंपनीमध्ये प्रशिक्षण सुरु करणार आहेत. वरील इंटरव्यू हे शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी रोजी फिनोलेक्स अकॅडमीमध्ये पार पडले. सर्व यशस्वी विद्यार्थांचे तसेच याकरिता प्लेसमेंटसेल तर्फे काम केलेल्या प्रा. रुपेश सावंत आणि डॉ. उमेश सकपाळ यांचे महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी अभिनंदन केले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)