gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा तृतीय वर्षाचा निकाल जाहिर

मुंबई विद्यापीठातर्फे नोव्हेंबर २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष वाणिज्य सत्र-५ चा निकाल नुकताच जाहिर करण्यात आला आहे. यावर्षी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा एकूण निकाल ७१.८८% लागला असून वाणिज्य शाखेच्या उत्तम निकालाची परंपरा कायम राखली आहे. कु. सना फकीर (८७%); कु. ऐश्वर्या जोशी (८४.८६%) आणि गौरव महाजनी (८४.७१%) हे विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय आले आहेत. २० विद्यार्थी ‘ओ’ ग्रेड, १०२ विद्यार्थी ‘ए’ ग्रेड, ८१ विद्यार्थी ‘बी’ ग्रेड, ५१ विद्यार्थी ‘सी’ ग्रेड, १६ विद्यार्थी ‘डी’ ग्रेड आणि १ विद्यार्थी ‘ ’ ग्रेड मिळवून उत्तीर्ण आहेत. त्याचप्रमाणे विषयनिहाय पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉमर्स पेपर ३ मध्ये कु. सना फकीर ९० गुण, अर्थशास्त्र कु. मृण्मयी साळवी ८८ गुण, फायनाशियल अकौटीग कु. अनुजा भाटकर ९४ गुण, कॉस्ट अकौटीग कु. सना फकीर ९४ गुण, मॅनेजमेंट अकौटीग कु. ऐश्वर्या जोशी १०० गुण, मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट कु. शब्दाली देसाई ७२ गुण, फायनान्शियल मॅनेजमेंट अक्षय पेडणेकर ७५ गुण, मार्केटिंग मॅनेजमेंट कु. मेघा पाचकुडे ७५ गुण, डी.आय.टी. कु. दीप्ती काणेकर व कु. मृणाली साळवी ९७ गुण, पी.एस.के. प्रतिक मुळ्ये ९० गुण, आणि कॉम्पुटर सायन्स रोहीतकुमार अश्वा ७८ गुण प्राप्त करून या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय असे यश प्राप्त केले आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, विभागप्रमुख प्रा. बी. सी. भिंगारदिवे यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.
 
  • 2018 (143)
  • 2017 (184)
  • 2016 (37)