gogate-college-autonomous-logo

राष्ट्रीय ज्यूनियर महिला पॉवरलिफ्टिंग स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्य महिला पॉवरलिफ्टिंग संघात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कु. तेजस्विनी सावंत आणि कु. नेहा नेने यांचा समावेश

tejaswini-sawant-and-neha-nene-selection

भारतीय पॉवरलिफ्टिंग फेडरेशनच्यावतीने कोईमतूर, तामिळनाडू येथे दि. ०७ ते १२ जानेवारी २०१८मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय जुनिअर महिला पॉवरलिफ्टिंग स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्य महिला पॉवरलिफ्टिंग संघात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कु. तेजस्विनी सावंत (७२ किलो वजनीगट) आणि कु. नेहा नेने (६३ किलो वजनीगट) यांची निवड झाली आहे.

यापूर्वी या विद्यार्थीनी रत्नागिरी जिल्हा महिला पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या संघातून महाराष्ट्र राज्य ज्यूनियर महिला पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्र राज्य ज्यूनियर महिला पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या आणि या स्पर्धेत कु. तेजस्विनी सावंत (७२ कि.) सुवर्णपदक तर कु. नेहा नेने (६३ कि.) रौप्य पदक यांनी उत्तम कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्र राज्य महिला पॉवरलिफ्टिंग संघात स्थान पटकावले.

या स्पर्धेकरिता मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. देवानंद शिंदे, मुंबई विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, श्री. प्रसाद गवाणकर या मान्यवरांनी हार्दिक अभिनंदन करून व पुढील वाटचालीकरिता हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Comments are closed.