gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात उपविजेतेपद

youth-festival-success

मुंबई विद्यापीठाच्या ४९व्या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सवामद्धे २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाकरिता गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला उपविजेतेपद प्राप्त झाले आहे. मुंबई विद्यापीठ येथे झालेल्या एका दिमाखदार समारंभात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा गौरव मा. कुलगुरू यांच्या हस्ते करण्यात आला. नाट्य, नृत्य, संगीत, वाङमय, ललित कला या पाच कलाप्रकारांतून सुमारे ३८ स्पर्धा घेण्यात येतात. यातील विजेत्या महाविद्यालयांचे गुणांकन केले जाते. त्यामद्धे एकपात्री अभिनय स्पर्धेसाठी कु. स्मितल चव्हाण हिला सुवर्णपदक, मिमिक्रीसाठी कु. स्नेहा आयरे हिला सुवर्णपदक, फोटोग्राफी करिता सर्वेश दामले याला सुवर्णपदक, वादविवाद स्पर्धेत मैत्रयी बांदेकर आणि कल्पेश जाधव यांनी सुवर्णपदक, हिंदी वक्तृत्व स्पर्धेकरिता पेडणेकर हिला सुवर्णपदक, जॅकपॉट विजेता जयदीप परांजपे यांनी विशेष सुयश प्राप्त केले. मुंबई विद्यापीठासाठी संलग्न सुमारे ७०० महाविद्यालयांमद्धे झालेल्या सांस्कृतिक स्पर्धेतील उपविजेतेपद हा विशेष बहुमान असून कोकण विभागातील हे पहिले सुयश आहे.

मुंबई विद्यापीठ येथे झालेल्या समारंभाकरिता गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, प्रा. आनंद आंबेकर आणि श्री. जयदीप परांजपे, कु. स्नेहा आयरे हे विद्यार्थी उपस्थित होते.

या सुयशाबद्दल र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे यांनी महाविद्यालयाचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.