gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बी.एम.एस. विभागामार्फत विविध कार्यक्रम संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बी.एम.एस. विभागामार्फत दि. ५ ते १० मार्च या सप्ताहात विविध कार्यक्रम घेण्यात आले.

पहिल्या दिवशी रत्नागिरीचे अप्पर पोलीस अधिक्षक श्री. मितेश घट्टे यांचे ‘तरुण पिढी आणि वाढती गुन्हेगारी’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. यामद्धे त्यांनी वाढती गुन्हेगारी, तरुणांचा सहभाग आणि कायदेशीर कारवाही या विषयी चर्चा केली. दि. ६ रोजी धेंपो कॉलेज, गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाविद्यालयाचे पाच विद्यार्थी सहभागी झाले. या स्पर्धेत उत्कृष्ट व्यवस्थापक, मानवी संसाधने, विपणन प्रक्रिया आणि सांघिक कार्य या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपली कौशल्ये दाखविली.

दि. ७ रोजी अॅड. आशिष बर्वे यांचे ‘भारतीय संविधान’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांनी संविधानातील विविध कलमांवर सविस्तर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. दि. 8 रोजी ‘जागतिक महिला दिनाचे’ औचित्य साधून विभागातील विद्यार्थीनिंनी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या मूक बधीर विद्यालयास भेट देऊन तेथील विद्यार्थीनिंना सॅनीटरी नॅपकीनचे वाटप केले.

दि. १० रोजी श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य अॅड. राजशेखर मलुष्टे यांचे ‘मानवी हक्क’ या विषयाला वाहिलेले व्याख्यान संपन्न झाले. त्यांनी आपले विचार मांडताना मानवी हक्काची पार्श्वभूमी, मानवी हक्कांचे महत्व आणि मानवी हक्कांच्या वैश्विक जाहिरनाम्याचा उल्लेख केला.

वरील सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागप्रमुख प्रा. अश्विनी देवस्थळी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी प्रयत्न केले. सर्व विद्यार्थ्यांनी यामद्धे आपला उल्लेखनीय सहभाग नोंदवला.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)