gogate-college

गोगटे जोगळेकरमहाविद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहपूर्ण आणि विविध कार्यक्रमांनी साजरा

गोगटे जोगळेकरमहाविद्यालयामद्धे सकाळी ०७.४० वाजता प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय छात्र सेनेतील विद्यार्थ्यांनी डॉ. एस. एल. भट्टार यांच्या नेतृत्वाखाली शानदार परेडचे संचलन केले.

त्यानंतर महाविद्यालयाच्या गणित विभागाचे ‘रामानुजन: द इंडियन जिनिअस’; आय.टी. विभागाचे ‘अमेझिंग गझेटस’, महिला विकास कक्षाचे ‘भारतीय राजकारणातील कर्तृत्ववान स्त्रिया’ इ. भित्तीपत्रकांचे अनावरण करण्यात आले.

राधाबाई शेट्ये सभागृहात संपन्न झालेल्या प्रमुख कार्याक्रमात अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या ‘सहकार’ या वार्षिकांकाचे प्रकाशन संपन्न झाले. यावेळी सहकार तयार करण्यात महत्वाचे योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर महाविद्यालयाच्या ‘झेप’ युवामहोत्सवातील फोटो अल्बमचे प्रकाशन करण्यात आले.

महाविद्यालयाच्या परंपरेनुसार सदर कार्यक्रमादरम्यान विविध पुरस्कार देण्यात आले. आदर्श विद्यार्थी वाचक ‘ग्रंथरत्न’ पुरस्कार कनिष्ठ महाविद्यालयातील विश्वजित जितेंद्र सागवेकर, वरिष्ठ महाविद्यालयातील कु. श्वेता प्रदीप आंब्रे यांना देण्यात आला. तर आदर्श शिक्षक ‘ग्रंथरत्न सन्मान’ इतिहास विभाग प्रमुख डॉ. रमेश कांबळे यांना प्रदान करण्यात आला. आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार श्री. नामदेव सुवरे यांना तर आदर्श शिक्षक पुरस्कार कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. सुशील वाघधरे यांना तर वरिष्ठ महाविद्यालयातील डॉ. वामन सावंत यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांमधील सहभागाचा उल्लेख केला आणि पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. कार्याक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. तृप्ती धामणस्कर यांनी केले.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)