gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या दिव्या पाटीलची राष्ट्रीय स्तरावरील भौतिकशास्त्र फेलोशिपसाठी निवड

Divya Patilगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कु. दिव्या पाटील हिची इंडियन अॅकॅडमी ऑफ सायन्सतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या समर रिसर्च फेलोशिपकरिता निवड झाली आहे. याअंतर्गत तिला ‘साहा इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लिअर फिजिक्स, कोलकाता’ येथे डॉ. पद्मज मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली आठ आठवडे भौतिकशास्त्रातील मुलभूत संशोधनाचे काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे.

या निवडीबद्दल भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. महेश बेळेकर आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कु. दिव्या हिचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)