gogate-college-autonomous-logo

”गोगटे जोगळेकर महाविद्यालयात झेप अंतर्गत रंगली गझल आणि काव्यवाचनाची मैफील”

रत्नागिरी एज्यूकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात सुरु असणाऱ्या ‘झेप’ या वार्षिक युवा महोत्सवांतर्गत गझल आणि काव्यवाचन स्पर्धा उत्सहात संपन्न झाल्या.
महाविद्यालयाच्या कै. ज. श. केळकर सभागृहात झालेल्या गझल सादरीकरण स्पर्धेप्रसंगी कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ.चित्रा गोस्वामी, श्रीमती लाला आदी मान्यवर उपस्थित होत्या. स्पर्धेसाठी श्री. मोईन सय्यद परीक्षक म्हणून लाभले होते. यामध्ये निदा मस्तान हिने प्रथम, अस्मा शेख हिने व्दितीय तर सादिया बुडये हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. उत्तेजनार्थ बक्षिसासाठी प्रथमेश कोटकर आणि पूर्वा चुनेकर यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन तैबा बोरकर हिने केले. या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी उर्दू विभागप्रमुख प्रा. दानिश गनी यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यानंतर मराठी विभागातर्फे आयोजित काव्यवाचन स्पर्धेसाठी डॉ. चित्रा गोस्वामी याच्यासह प्रा. जयंत अभ्यंकर, झेप समन्वयक प्रा. आनंद आबेकर, परिक्षक श्री. प्रसाद गवाणकर, श्री सरदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते. या काव्यवाचन स्पर्धेत विजय बिळूर प्रथम, पूर्वा चुनेकर व्दितीय तर शार्दुल रानडे आणि सुरभी वायगंणकर तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. सूत्रसंचालन अस्मिता गोखले आणि श्वेता खानविलकर यांनी केले. आभार आदिती जोशी हिने मानले. या कार्यक्रमाचे संयोजन तृतीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थांनी केले होते. यासाठी त्यांना प्रा. सायली पिलणकर आणि डॉ. दिनेश माश्रणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Comments are closed.