gogate-college
diwali magazine 2016

कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात दिवाळी अंकांचे प्रदर्शन संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात दिवाळी अंक २०१६ चे प्रदर्शन नुकतेच आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले.

या प्रसंगी विद्यार्थी आणि प्राधापक यांचेशी संवाद साधताना त्यांनी ‘विविध विषयांना वाहिलेला हा साहित्यिक फराळ सर्वांनाच भावेल. तसेच काही अंक हे विशेषांक असून ते आपणास सखोल माहिती देतील’ असे नमूद केले. आणि या उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन प्र. ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांनी केले. याप्रसंगी ग्रंथालय समिती समन्वयक डॉ. मंगल पटवर्धन, प्रा. बी. सी. भिंगारदिवे तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्यार्थी आणि ग्रंथालयीन कर्मचारी उपस्थितीत होते.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)