gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात पदवीदान समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या व मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा पदवी प्रमाणपत्र वितरण समारोह गोगटे जोगळेकर महाविद्यालाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात नुकताच संपन्न झाला. गुरु नानक खालसा कॉलेज, मुंबईचे प्राचार्य तसेच ‘नॅशनल फॅसिलीटी बियोटेटेक्नोलॉजी सेंटरचे संचालक डॉ. किरण माणगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर गोगटे जोगळेकर कॉलेजचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. किरण माणगावकर आणि कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले.

तसेच या कार्यक्रमाचे औचीत्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि गुरु नानक खालसा महविद्यालय, मुंबई यांच्यामद्धे ‘सामंजस्य कराराला’ मूर्त स्वरूप देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजश्री भावे यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शविली.

Comments are closed.