gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कम अॅन लर्न फिजिक्स उपक्रम

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे भौतिकशास्त्रातील काही मुलभूत संकल्पनांवर आधारित प्रयोगांचे प्रदर्शन दि. १८ फेब्रुवारी २०१६ रोजी आयोजित करण्यात आले होते. ‘कम अॅन लर्न फिजिक्स’ उपक्रमांतर्गत विज्ञात जत्रेमध्ये इ. ९वी च्या विद्यार्थांसाठी उपयुक्त माहिती देणारे काही प्रयोग मांडण्यात आले होते.

या प्रदर्शनाचा जी.जी.पी.एस. आणि शिर्के हायस्कूलमधील विद्यार्थांनी लाभ घेतला. महाविद्यालयातील पदवीच्या विद्यार्थांनी सदर प्रयोगांची मांडणी केली व शालेय विद्यार्थांना अतिशय सोप्या भाषेत प्रयोगांच्या मागील असलेली तत्वे समजावून सांगितली.

प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. महेश बेळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला अतिशय उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)