gogate-college

गोगटे जोगळेकर मध्ये जैव-माहिती तंत्रज्ञान कार्यशाळा उत्साहात संपन्न

दि. १० व ११ फेब्रुवारी रोजी गो.जो. महाविद्यालयात जीवशास्त्र विभागातर्फे “जैव-माहिती तंत्रज्ञान” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेमध्ये जैव-माहिती तंत्रज्ञानाची ओळख, ड्रग डिझायनिंग, प्रोटीन अॅनासॅसिस, प्रायमर डिझायनिंग, प्रोटीन सिक्वेन्स अॅनासॅसिस या विषयावर खोलवर माहिती देणारी व्याख्याने आयोजित केली होती. कार्यशाळेचा दुसरा दिवस हा संपूर्णपणे प्रात्याक्षिकांसाठी राखीव होता. यामध्ये सर्व सहभागी विद्यार्थांनी माहिती- तंत्रज्ञान प्रयोगशाळेमध्ये संगणकावरती ऑनलाइन प्रात्याक्षिके पूर्ण केली. त्याचबरोबर कार्यशाळेच्या एका विशेष व्याख्यानामध्ये जैव-माहिती तंत्रज्ञान आस्थापनांची माहिती तसेच त्यामधील नोकरीसंधी मिळविण्यासाठी लागणारी पूर्वतयारी बद्दल मार्गदर्शन केले गेले. या संपूर्ण दोन दिवसीय कार्यशाळेसाठी डॉ. अजय पथक, श्री. मंदार सावंत व श्री. शुभम पांचाल यांनी संसाधन व्यक्ती म्हणून कार्य केले.

जैव-माहिती तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्या ३४ विद्यार्थांनी या कार्यशाळेचा लाभ उठविला. यामध्ये प्रामुख्याने महाविद्यालयाच्या जीवशास्त्र विभागातील पदवी व पदव्युत्तर विभागातील विद्यार्थांची समावेश होता. तसेच कार्यशाळेसाठी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय खरवते दहिवडी चिपळूण यथील दोन प्राध्यापिका उपस्थित होत्या.

तत्पूर्वी या कार्यशाळेचे उद्घाटन दि. १० फेब्रुवारी रोजी स. १०.३० वा. महाविद्यालाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. ए.एस. कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. कार्यशाळेच्या शेवटी समारोप समारंभामध्ये सर्व सहभागी विद्यार्थांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. उद्घाटन व समारोप या दोन्ही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सिद्धेश भागवत यांनी केले.

कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले तसेच कार्यशाळेच्या यशस्वी व्यवस्थापनामध्ये जीवशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापकांचे मोलाचे योगदान होते.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)