gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बायोलॉजीकल सायन्स विभागातर्फे जैवमाहिती तंत्रज्ञान विषयक कार्यशाळेचे आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बायोलॉजीकल सायन्स विभागातर्फे ‘जैवमाहिती तंत्रज्ञान आणि त्याची उपयुक्तता’ या विषयावर दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे, गणित विभाग प्रमुख डॉ. राजीव सप्रे उपस्थित होते.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर म्हणाले, बयोइंफर्मेटिक्स ही बायोलॉजीकल सायन्स, संगणकशास्त्र आणि गणितीशास्त्र यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेली जैवतंत्रज्ञानाची नवी शाखा असल्याचे सांगितले. डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी जनुकीय आणि प्रथिनांच्या संशोधनात तसेच औषध निर्मिती क्षेत्र, उत्क्रांती संशोधन, मुलभूत संशोधन यांमध्ये जैवतंत्रज्ञानाचा मोलाचा वाटा असल्याचे विषद केले.

या कार्यशाळेला डॉ. राजीव सप्रे, डॉ. अजय पाठक आणि प्रा. मंदार सावंत हे मार्गदर्शक म्हणून लाभले. डॉ. राजीव सप्रे यांनी जैवतंत्रज्ञानाची ओळख आणि त्यातील करियरच्या संधी याविषयी तर डॉ. पाठक आणि सावंत यांनी जैवतंत्रज्ञान विषयातील विविध सखोल माहिती सोप्या पद्धतीने दिली.

या कार्यशाळेकरिता महाविद्यालयातील प्रा. महेश नाईक, इतर प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments are closed.