gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कार्यालयीन कर्मचारी व शिक्षकांसाठी “ऑफिस ऑटोमेशन सॉफ्टवेअर – CASCADE” ह्या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कार्यालयीन कर्मचारी व शिक्षकांसाठी “ऑफिसऑटोमेशन सॉफ्टवेअर –CASCADE” ह्या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या “शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गुणवत्ता आणि प्रशिक्षण” समिती यांच्यातर्फे शिक्षक व कार्यालयीन कर्मचारी यांकरिता दिनांक ८ व ९ ऑक्टोबर २०२१ रोजी “ऑफिस ऑटोमेशन सॉफ्टवेअर–CASCADE” ह्या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले गेले. ह्याप्रसंगी व्यासपीठावर प्र. प्राचार्य डॉ. पी.पी.कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर व प्रमुख व्याख्याते श्री. नितीन रहाळकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत समितीचे समन्वयक डॉ. महेश बेळेकर यांनी केले व प्राचार्य डॉ. पी.पी.कुलकर्णीयांनी सहभागींना मार्गदर्शन केले.

ह्या कार्यशाळेसाठी प्रशिक्षक म्हणून लाभलेले श्री. नितीन रहाळकर ASTUTE Information Management Solutions ह्या संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी त्यांच्या सहाय्यक मिस. सद्बुद्धी सिनकर यांसोबत अत्यंत ओघावत्या शैलीमधून त्यांनी तयार केलेल्या CASCADE ह्या सॉफ्टवेअरबद्दल पूर्ण ओळख करून दिली. दोन दिवस चालेल्या ह्या कार्यशाळेमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थी प्रशासनकरीता हे सॉफ्टवेअर कसं उपयोगी आहे, ह्याबद्दल माहिती देण्यात आली आणि दुसऱ्या दिवशीच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांचे निकाल व त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी द्यावा लागणारा डेटा कसा मिळवावा ह्याबद्दल मार्गदर्शन झालं.

या कार्यशाळेमध्ये एकूण 17 शिक्षक आणि 17 कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला. सहभाग्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ही कार्यशाळा उत्तमरीत्या पार पडली.

आपलं कार्यालय १००% ऑटोमेशनकडे जाण्याच्या प्रयत्नास ह्या सॉफ्टवेअरचा नक्कीच फायदा होईल अशी आशा प्राचार्यांनी समारोपप्रसंगी व्यक्त केली. समारोप कार्यक्रमाला विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या डॉ.अपर्णा कुलकर्णी, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक आणि कलाशाखेचे उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई हे देखील उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. महेश बेळेकर यांनी केले.

Workshop on office automation software

Comments are closed.