gogate-college

स्पर्धा परीक्षा तयारी संदर्भात वेबीनारचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. २६ रोजी आयोजन

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी ग्रंथालय विभाग, आय.क्यू.ए.सी.विभाग तसेच द युनिक एकॅडमी, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने झूम अॅपद्वारे गुरुवार दि. २६ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता एक दिवसीय ऑनलाइन फ्री वेबीनार आयोजित करण्यात आला आहे.

सदर वेबीनारचा विषय ‘पदवी काळात यूपीएससी/एमपीएससी स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी’ असा असून द युनिक एकॅडमीचे प्रा. हर्षद लवंगारे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

वेबिनारच्या अधिक माहितीसाठी ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे (९४२१२३२३२४) यांच्याशी संपर्क साधावा तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सदर वेबीनारचा लाभ घ्यावा असे आवाहन प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे

Comments are closed.