gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘राष्ट्रीय मतदार दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून प्रतिवर्षी दि. २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. निवडणुका या लोकशाहीचा आधार आहेत. भारताने प्रातिनिधिक शासन पद्धतीचा स्विकार केला असून, प्रत्येक भारतीय नागरिकाला मताधिकार बहाल केला आहे. नागरिकांमध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने सन २०११ पासून ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा केला जातो. यंदाच्या मतदार दिनाची ‘no voter to be left behind’ अशी संकल्पना होती.

या पार्श्वभूमीवर गोगटे जोगळेकर महाविद्यालयातही प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यशास्त्र विभाग आणि मतदार साक्षरता क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त महाविद्यालयातील नवमतदार विद्यार्थ्यांना मतदारदिनी घ्यावयाची शपथ उपप्राचार्य व शिक्षकांच्या मध्यापासून वर्गात देण्यात आली. याप्रसंगी सुमारे ४५० नवमतदारांनी शपथ घेतली.

नवमतदारांना मतदार साक्षरता क्लबचे मुख्य समन्वयक प्रा. तुळशीदास रोकडे आणि सह समन्वयक प्रा. निलेश पाटील यांनी मार्गदर्शन लेले. सदर कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comments are closed.