gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला सारस्वत महाविद्यालय, गोवा येथील विद्यार्थ्यांची भेट

म्हापसा, गोवा येथील सारस्वत विद्यालयाचे श्रीदोरा काकुलो वाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयासोबत असलेल्या सामंजस्य कराराचा एक भाग म्हणून तेथील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाला भेट दिली. शिक्षक-विद्यार्थी आदान-प्रदान कार्यक्रमांतर्गत व्याख्यान, चर्चासत्र, सादरीकरण इ. गोष्टी विभागाबरोबरच्या दोन दिवसांच्या भेटीत झाल्या. सारस्वत महाविद्यालयाच्यावतीने प्रा. कबीर शिरोडकर, प्रा. तुषार करमाळकर, प्रा. चैताली गवस आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील प्राध्यापकवर्ग आणि ५० विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.

यावेळी अभ्यास आणि अभ्यासेतर उपक्रमांबद्दल अर्थपूर्ण चर्चा झाली आणि पुढील विविध उपक्रमांविषयी दिशा ठरविण्यात आली. उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, विभागप्रमुख प्रा. बी. सी. भिंगारदिवे, डॉ. मकरंद साखळकर, डॉ. सीमा कदम आणि विभागातील प्राध्यापक यांनी सहभाग घेतला. सादर आदान-प्रदान कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता प्रा. रुपेश सावंत यांनी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले.

Comments are closed.