gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालय वनस्पतीशास्त्र विभागाची ‘राष्ट्रीय आभासी परिषद’ संपन्न

दि. 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, त्यासाठी यावर्षी 2020 साठी संयुक्त राष्ट्रसंघानी जैवविविधता (Biodiversity) ही थीम दिली होती. म्हणून या दिवसाचे औचित्य साधून आणि गेले दिड दोन महिने कोरोना व्हायरसमुळे चालू असलेले लॉकडाऊन परीस्थितीचा विचार करून वनस्पतीशास्त्र विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांनी मुंबई विद्यापीठ, रत्नागिरी उपकेंद्र, मुंबई विद्यापीठ व पर्यावरण संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ बायोडायव्हरसिटी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ या विषयावर दि. 5 व 6 जून रोजी एका राष्ट्रीय आभासी परिषदेचे ( National Varitual Conference) आयोजन केले होते.

परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी व्हिडिओ क्लिप्सच्या माध्यमातून डॉ मंगल पटवर्धन विभाग प्रमुख, वनस्पती शास्त्र विभाग यांनी या परिषदेमागची संकल्पना व त्याची आवश्यकता विषद केली. डॉ राजीव सप्रे गाणीव विभागप्रमुख आणि महाविद्यालयाचे IQAC coordinator यांनी यावेळी या परिषदेसाठी कोणती तंत्रे जसे की फेसबुक, गुगल मीट आणि का वापरण्यात येणार याची माहिती दिली. प्राचार्य डॉ किशोर सुखटणकर यांनी परिषदेत भाग घेणार्या सर्व सहभागी व्यक्तिना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या तसेच पर्यावरण संस्था रत्नागिरी चे अध्यक्ष डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी पर्यावरणसंस्थेच्या वतीने दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षीय समारोप श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्याध्यक्ष, रत्नागिरी शिक्षण संस्था यांनी केले. त्यावेळी त्यांनी नैसर्गिकरित्या व फुकट मिळणाऱ्या प्राणवायूचा आणि सध्याच्या स्थितीत आवश्यकता असणार्या व्हेंटिलेटरची तुलना करणार्या कथेच्या माध्यमातून पर्यावरणाचे महत्त्व विशद केले. या सत्राचे संचालन डॉ. सोनाली कदम यांनी केले.

या परिषदेत विविध सत्रांमधे प्रोफेसर डॉ. जनार्दनम् गोवा विद्यापीठ, Plant animal interaction, प्रोफेसर यादव, माजी विभागप्रमुख, वनस्पती शास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, ‘Biodiversity in western ghats’, डॉ, ढाकेफळकर संचालक, आघारकर संशोधन संस्था, पुणे ‘Molecular Exploration of Diverse Microbes for Taxonomic Novelty and Industrial Applications’ व डॉ अंकुर पटवर्धन, जैवविविधता विभाग प्रमुख, गरवारे कॉलेज, पुणे ‘Butterfly odorants to enhance pollination and ecosystem health’ याविषयांवर बीजभाषणे झाली. त्यावेळी त्यांनी विविध बाजूंनी जैवविविधता निर्मीती, अस्तित्व, जतन, त्यासाठी त्यातील प्रत्येक घटक जसे की वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव इत्यादिंनी एकमेकांना केलेले सहाय्य व माणसाच्या विकासासाठी त्या सर्व घटकांचे जतन करण्याची गरज पटवून दिली.

या परिषदेत भारतभरातून 24 राज्यातील 195 व्यक्तींनी सहभाग नोंदविला. त्यापैकी 57 सहभागींनी आपले शोध निबंध पीपीटी व पोस्टरच्या व्हिडिओ माध्यमातून 5 वेगवेगळ्या सत्रांमधे सादर केले. या विविध सत्रांमधे प्रश्नोत्तरे तसेच अभिप्राय चॅटबॉक्सच्या सहाय्याने संचलीत करण्यात आले.

वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. मंगल पटवर्धन यांच्या कल्पनेतून साकार झालेला हा गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरीचा हा आभासी परिषद घेण्याचा पहिलाच प्रयत्न प्रत्यक्ष रत्नागिरीला न येता तंत्रज्ञानाच्या मदतीने जम्मू काश्मीर, ओडिशा, मेघालय पासून ते तामीळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ इ. 25 राज्यातून सहभागी झालेल्या 195 व्यक्तींमुळे, तसेच यासाठी काम करणार्या तंत्रज्ञान टिममधील प्रा. ऋजुता गोडबोले, वनस्पतीशास्त्र विभाग, प्रा. वरुणराज पंडित, आयटी विभाग व प्रा. प्रतिक शितुत, गणित विभाग यांच्या कष्टामुळे, तसेच वनस्पती शास्त्र विभागातील प्रा. शरद आपटे व प्रा. प्रियांका शिंदे यांच्या सहकार्याने व प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, उपप्राचार्य विवेक भिडे, तसेच गणित विभागप्रमुख डॉ. राजीव सप्रे, भूगोल विभागप्रमुख डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विभाग प्रमुख प्रा. जी. एस. कुळकर्णी, श्री. प्रसाद गवाणकर यांच्या सहकार्याने संपन्न झाली.

प्रोफेसर डॉ. जनार्दनम्

प्रोफेसर डॉ. जनार्दनम्

Dr. Prashant Dhakephalkar

डॉ, ढाकेफळकर

प्रोफेसर यादव

प्रोफेसर यादव

Comments are closed.