gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे राज्यस्तरीय ‘उपयोजित गणित संशोधन प्रकल्प स्पर्धा’ संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे राज्यस्तरीय ‘उपयोजित गणित संशोधन प्रकल्प स्पर्धा’ संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे नुकतीच राज्यस्तरीय उपयोजित गणित संशोधन प्रकल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे हे चौथे वर्ष होते. आजच्या स्पर्धेच्या युगात संशोधनाला खूप महत्व आहे. हेच कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावे हे उद्दीष्ट समोर ठेऊन गणित विभागाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेकरिता मुंबई, पुणे, गोवा, बेळगाव, सांगली, देवरुख, लांजा, कुडाळ, रत्नागिरीमधील १४ महाविद्यालयातील ४६ स्पर्धक १९ गटांतून सहभागी झाले होते. पैकी जी.एस.एस. महाविद्यालय, बेळगाव; विलिंग्डन महाविद्यालय, सांगली आणि शासकीय महाविद्यालय, साखळी, गोवा या महाविद्यालयांबरोबरच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा सामंजस्य करार आहे. स्पर्धेचे परीक्षण कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, गोवा येथील प्रा. संजय जहागीरदार आणि फिनोलेक्स इंजिनीरिंग कॉलेजचे गणित विभागप्रमुख संजय कुलकर्णी या मान्यवरांनी केले.

स्पर्धकांनी आपल्या साद्रीकारानातून मांडलेले विविध प्रकारचे गणितातील संशोधन, परीक्षकांनी त्यांना विचारलेले प्रश्न, त्या प्रश्नांना दिलेली अभ्यासपूर्ण उत्तरे अशा उत्साही आणि आनंदपूर्ण वातावरणात सदर उपयोजित गणित संशोधन प्रकल्प स्पर्धा संपन्न झाली.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य विवेक भिडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सर्व स्पर्धकांचे स्वागत केले आणि स्पर्धेकरिता शुभेच्छा व्यक्त केल्या.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या उपस्थितीत सांगता समारंभ संपन्न झाला. या स्पर्धेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आणि स्पर्धकांनी केलेल्या सादरीकरणाबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक तसेच बक्षिसपात्र विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र आणि पारितोषिक देऊन गौरविले.

सदर स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे आहेत. प्रथम क्रमांक गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मुग्धा पोखरणकर आणि मुक्ताई देसाई; द्वितीय क्रमांक दिव्या नाडर, साठ्ये महाविद्यालय, पारले, मुंबई; तृतीय क्रमांक फिनोलेक्स इंजिनीरिंग कॉलेज, रत्नागिरीचे प्रणव दामले आणि समर्थ शिंदे आणि उत्तेजनार्थ पारितोषिक अभिषेक खेर, रिषभ दुबे, कुणाल सिंग, र. जे. महाविद्यालय, घाटकोपर, मुंबई.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निहारिका पेवेकर आणि अपूर्वा आचार्य यांनी केले. गणित विभागप्रमुख डॉ. राजीव सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाली.

Comments are closed.