gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष वाणिज्य विभागाचा निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठातर्फे मे २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या उन्हाळी सत्र परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष वाणिज्य विभागाचा नीला १००% लागला आहे.

वाणिज्य विभागात प्रथम क्रमांक सोनाली सुहास मुळ्ये, द्वितीय क्रमांक गायत्री उदय करंदीकर आणि तृतीय क्रमांकाने गौरी सुनील सावंत, श्वेता सुर्यकांत सावंत, पूजा विठ्ठल बिरादार यांनी बाजी मारली.

विभागाचा विषयनिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे. अर्थशास्त्रविषयात प्रथम सोनाली सुहास मुळ्ये आणि विनायक राजेश शानभाग; कॉमर्समध्ये प्रथम प्रियांका राजेंद्र गावडे, पूजा मधुकर देवकर; फायनान्शियल अकौंटन्सीमध्ये २१ विद्यर्थ्यांना १०० गुण मिळाले; कॉस्ट अकौंटन्सीमध्ये १० विद्यार्थ्यांना ९८ गुण मिळाले; बी.एम.१ पूजा कदम; बी.एम-२ प्रज्वल हळदणकर; डी.आय.टी.मध्ये ५ विद्यार्थ्यांना ९८ गुण मिळाले. ए.एम.एम.आय.मध्ये रसिका नारकर, एम.आर.मध्ये पूजा कदम,परेश शेलार,अनिकेत सावंत; पी.एस.के.मध्ये पूजा बिरादार, गौरी सावंत, सोनाली मुळ्ये, वल्लभ महाबळ, कॉम्पुटर सिस्टीम सफा शेख, सफा बैरागदार, सदफ मुल्ला या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले आहे.

यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक प्राध्यापक यांचे र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, विभाग प्रमुख डॉ. सीमा कदम यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.