gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे दोन दिवसीय गणित कार्यशाळा संपन्न

Math Workshop

राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाच्या सहकार्याने, मराठी विज्ञान परिषद, मुंबई आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा गणित विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 18 आणि 19 जानेवारी 2019 रोजी रा. भा. शिर्के प्रशाला, रत्नागिरी मधील माध्यमिक शिष्यवृत्ती च्या विद्यार्थ्यांकरिता दोन दिवसीय गणित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी रा. भा. शिर्के प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. गुळवणी, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे गणित विभाग प्रमुख डॉ. राजीव सप्रे उपस्थित होते.

सदर कार्यशाळेला महाविद्यालयाच्या गणित विभागातील शिक्षक डॉ. राजीव सप्रे, गौरी पटवर्धन, दीप्ती वाकणकर आणि श्रद्धा सुर्वे हे व्याख्याते म्हणून लाभले होते. दोन दिवस चालेल्या या कार्यशाळेत ‘माध्यमिक शिष्यवृत्तीला सामोरे जाताना तयारी कशी आणि काय करावी’ याचे सोप्या आणि रंजक पद्धतीने सर्व प्राध्यापकांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. रा. भा. शिर्के प्रशालेच्या माध्यमिक शिष्यवृत्तीकरिता बसलेल्या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.

कार्यशाळेच्या आयोजनासाठी मराठी विज्ञान परिषदेचे समन्वयक डॉ. उमेश संकपाळ यांनी विशेष प्रयत्न घेतले. गोगटे जोगळेकर महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी ही कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल आयोजकांचे आणि सहभागी व्यक्तींचे कौतुक केले.

Comments are closed.