gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे कै. बाबुराव जोशी ग्रंथालयाचे लहू घाणेकर यांना श्रद्धांजली

lahu-ghanekarगोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयाचे ग्रंथालय परिचर लहू लक्ष्मण घाणेकर यांचे दि. १२ सप्टेंबर २०२० रोजी अल्पशा आजाराने दुख:द निधन झाले. त्यांना महाविद्यालयातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली याप्रसंगी प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी यांनी कै. घाणेकर यांच्या महाविद्यालयातील सेवेचा आढावा घेतला. नेपथ्यकार, रंगभूषाकार म्हणून त्यांचा लौकिक होता. परंतु महाविद्यालयात सेवा करत असताना त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले. तसेच ग्रंथालयामध्ये काम करत असताना त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळत आपले योगदान दिले. सेवानिवृत्त झाल्यावरही त्यांनी रंगभूमीची सेवा केली.

याप्रसंगी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, ग्रंथपाल प्रा. किरण धांडोरे, प्रबंधक श्री. रवींद्र केतकर, श्री. प्रसाद गवाणकर आणि कर्मचारी उपस्थित होते.

Comments are closed.