gogate-college

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

प्रभावी व हजरजबाबी वक्ते, हळव्या मनाचे कवी, संयमी आणि द्रष्टे माजी पंतप्रधान अशा प्रतिमेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वर्गामद्धे भारतरत्न अटलजींच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली आणि विद्यार्थ्यांनीदेखील त्यांना आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

त्यानंतर महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. उपप्राचार्य डॉ. विवेक भिडे यांनी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विविध क्षेत्रातील भरीव योगदानाविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाला विविध विभागांचे उपप्राचार्य, प्राध्यापक, अध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.

Salute to Atal Bihari Vajpeyi
Comments are closed.