gogate-college-autonomous-logo

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे सप्तरंग स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या जोगळेकर महाविद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे ‘सप्तरंग’ हे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 21 डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाले. 205 कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला होता.

‘महाविद्यालयास पत्र’ ही अनोखी पोस्टकार्ड स्पर्धा यानिमित्ताने आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये ४७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गातील स्पर्धकांनी सहभाग घेतला. शिक्षकेतर कर्मचारी वर्गात, प्रथम क्रमांक नामदेव सुवरे, द्वितीय क्र,मांक प्रसाद गवाणकर तृतीय क्रमांक संतोष बंडबे यांनी पटकावला. कनिष्ठ महाविद्यालयीन गटात प्रथम क्रमांक विस्मया कुलकर्णी, द्वितीय क्रमांक सुशील वाघधरे, तृतीय क्रमांक सागर पोकळे यांना प्राप्त झाला. वरिष्ठ महाविद्यालयीन गटात प्रथम क्रमांक मधुरा दाते, द्वितीय क्रमांक श्वेता लाड-पटवर्धन, तृतीय क्रमांक विनायक गावडे यांनी पटकावला. विजेत्या पत्रांचे अभिवाचन करण्यात आले. सहभागींना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
यानिमित्ताने पाककला स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत
प्रथम – श्रावणी विभुते ( कोकणी स्वाद – अळू वडी, नारळ वडी, सोलकढी)
द्वितीय – अश्विनी देवस्थळी (घारकुटे वडे,चटणी, मिरची लोणचे)
तृतीय – मीनल खांडके (मेथी पराठे,मोदक) यांनी पटकावला. पाककला स्पर्धेत पुरुष स्पर्धकांसह १६ स्पर्धक सहभागी झाले होते. यानंतर विविध गुणदर्शन कार्यक्रमात ४२ कर्मचाऱ्यांनी कलागुणांचे प्रदर्शन केले. वाद्यवादन, काव्य सादरीकरण, गीत गायन, एकपात्री अभिनय, मिमिक्री, रेकॉर्ड डान्स, समूहगीत गायन या कला प्रकारांनी सप्तरंग सोहळा दिमाखात पार पडला. शिक्षकेतर कर्मचारी दीपक जोशी यांनी मै हू डिस्को डान्सर या गाण्यावर सर्वांना डोलायला लावले. गीत गायनात अंकित सुर्वे, निलेश गोडबोले, विशाखा साळवी, श्रुती वाघधरे यांनी गीते सादर केली. मिमिक्री नुरजँहा वस्ता यांनी सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

स्नेहसंमेलनाचा सोहळा स्नेह वाढवत आनंदात पार पडला. सप्तरंग या स्नेहसंमेलनाला मार्गदर्शन डॉ किशोर सुखटणकर यांनी केले. स्टाफ वेल्फेअर समितीच्या समन्वयक डॉ निधी पटवर्धन, सदस्य डॉ सोनाली कदम, डॉ. दिनेश माश्रणकर, डॉ. सीमा कदम, निलेश गोडबोले यांनी सप्तरंग यासाठी परिश्रम घेतले.

h
h
h
Comments are closed.