gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘जॉब फेअर २०१८’ यशस्वीरित्या संपन्न

Job Fair

बजाज फिनसर्व लि. या नामांकित बजाज ग्रुपमधील कंपनीच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांतर्गत ‘जॉब फेअर २०१८’ या कॅम्पस इंटरव्ह्यूचा मेगा इव्हेंट गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘करिअर गायडन्स अँड प्लेसमेंट सेल’च्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. या फेअरमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालायातील विद्यार्थ्याबरोबरच डी.बी.जे. महाविद्यालय, चिपळूण आणि आठल्ये सप्रे महाविद्यालय, देवरुखचे विद्यार्थीही सहभागी झाले होते. ५०४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, १७ विविध कंपन्या याठिकाणी आल्या होत्या तर जवळपास ३५०० पेक्षा अधिक मुलाखती दिवसभरात पार पडल्या. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे एकापेक्षा जास्त मुलाखती देण्याची संधी देण्यात आली होती. यातून आणि अंतिम मुकाखतीमधून निवाड झालेल्या विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नेमणूक देऊन लवकरच सामावून घेतले जाईल.

बजाज फिनसर्व लि. ही कंपनी कॅम्पस इंटरव्ह्यू बरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकारिता ‘बँकिंग, फायनान्स व इन्शुरन्स आणि मुलाखततंत्र’ असा एक महिन्याचा प्रमाणपत्र कोर्सचेही आयोजन करते.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, बजाज फिनसर्व लि. अधिकारी श्री. अजय साठे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, डी.बी.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्याम जोशी, आठल्ये सप्रे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, डॉ. मिलिंद गोरे, डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर बजाज फिनसर्व लि. अधिकारी श्री. अजय साठे यांनी प्रतिवर्षी १०,००० विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याचा आणि रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘करिअर गायडन्स अँड प्लेसमेंट सेल’च्या मार्फत नियमितपणे विविध नामवंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यूकरिता येत असतात. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती विद्यार्थ्यांना करिअरबाबत मार्गदर्शन करण्यास येत असतात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याचा निश्चितच लाभ होत असतो. प्लेसमेंट सेलचे हे काम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे उद्गार याप्रसंगी बोलताना डॉ. किशोर सुखटणकर यांनी काढले.

कार्याध्यक्ष श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी ‘येणाऱ्या नव्या संधीचा लाभ घेताना पदवीबरोबरच आवश्यक कौशल्ये आत्मसात करून स्वत:ला सिद्ध करण्याची गरज आहे’ असे विचार मांडले.

या सर्व उपक्रमाचे आयोजन बजाज फिनसर्व लि.च्या अर्चना भट, राजा सिक्रुज, महाविद्यालयाच्या ‘करिअर गायडन्स अँड  प्लेसमेंट सेल’चे समन्वयक डॉ. रुपेश सावंत, सदस्य डॉ. उमेश संकपाळ, डॉ. रामा सरतापे, श्री. प्रसाद गवाणकर यांनी यशस्वीरित्या केले.

Job Fair
Job Fair
Job Fair 2018
Comments are closed.