gogate-college-autonomous-logo

मुंबई विद्यापीठाच्या युवामहोत्सवात पुन्हा एकदा गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे निर्विवाद वर्चस्व

मुंबई विद्यापीठाच्या युवामहोत्सवात पुन्हा एकदा गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे निर्विवाद वर्चस्व

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाला मोठी सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. अतिशय मनाच्या समजल्या जाणाऱ्या युवामहोत्सवाचे हे ५२वे वर्ष. या युवामहोत्सवांतर्गत दक्षिण रत्नागिरी विभागाची प्राथमिक फेरी राजेंद्र माने इंजिनीरिंग महाविद्यालय,आंबव, देवरुख येथे संपन्न झाली.

या युवामहोत्सवात २० विविध कला प्रकारांमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने सुयश संपादन केले. विद्यार्थ्यांनी लोकनृत्य, हिंदी एकांकिका, स्कीट, समूहगीत, इंडियन लाईट व्होकल, इंडियन क्लासिकल व्होकल यामध्ये प्रथम; रांगोळी, पोस्टर, इंग्रजी वादविवाद, मराठी वादविवाद, मराठी वक्तृत्व, एकपात्री, मराठी एकांकिका यामध्ये द्वितीय; सुगम गायन, नाट्यसंगीत, मराठी एकपात्री, हिंदी एकपात्री, पेंटिंग आणि रांगोळी यामध्ये तृतीय क्रमांक; असे यश प्राप्त केले. प्रवीण पाटेकर, निलेश गोपनारायण, संदीप दंडवते, मयूर साळवी आणि ओंकार बंडबे यांनी विशेष मेहनत घेतली.

युवा महोत्सव यशस्वी होण्यासाठी विद्यापीठ सांस्कृतिक समन्वयक डॉ. निलेश सावे, राजेंद्र माने इंजिनीरिंग महाविद्यालय, आंबवचे प्राचार्य डॉ. महेश भागवत आणि जिल्हा सांस्कृतिक समन्वयक प्रा. आनंद आंबेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संघाबरोबर संघव्यस्थापक म्हणून प्रा. आरती पोटफोडे, प्रा. शुभम पांचाळ, प्रा. श्रावणी विभूते यांनी काम पहिले. तर विद्यार्थी व्यवस्थापन मयूर भाटकर याने केले.

यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक प्राध्यापक यांचे कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, तीनही शाखांचे उपप्राचार्य यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Comments are closed.